|Monday, February 24, 2020
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुशील कुमारचा सहभाग

राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुशील कुमारचा सहभाग 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दोन ऑलिम्पिकपदके जिंकणाऱया सुशील कुमार राष्ट्रकुल कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार असून रविवारपर्यंत ही स्पर्धा जोहान्सबर्ग येथे होत आहे.

राष्ट्रकुल कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुशीलने आतापर्यंत चार सुवर्णपदके पटकावलेली आहेत. तीन वर्षांच्या खंडानंतर सुशील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच सहभागी होत आहे. ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करताना मला खूप आनंद होत आहे. देशाचा लौकीक वाढविण्याचा माझा प्रयत्न असून तुम्हा सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद हवे आहेत,’ असे त्याने ट्विट केले आहे.

गेल्या महिन्यात इंदोरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुशील कुमारने सुवर्णपदक पटकावले. मात्र यासाठी त्याला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. कारण त्याच्या तीन प्रतिस्पर्ध्यांनी त्याला पुढे चाल दिली होती. पहिल्या दोन लढतीतच त्याला खेळावे लागले आणि त्यातही त्याला फक्त 2 मिनिटे 33 सेकंद खेळावे लागले. पुढील वर्षी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा महोत्सवाची तो तयारी करीत असून प्रो कुस्ती लीगमध्येही तो सहभागी होण्याची शक्मयता आहे.

Related posts: