|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » मुलाचे कौतुक करणार नाही,पण राहुलचा अभिमान : सोनिया गांधी

मुलाचे कौतुक करणार नाही,पण राहुलचा अभिमान : सोनिया गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राहुल माझा मुलगा आहे,त्याचे कौतुक करणे उचित ठरणार नाही,राहुलने लहानपणापासूनच हिसेंचे अपार दुःख सोसले आहे.राजकारणात त्याने वैयक्ति टीका सहन केली.त्यामुळे तो आणखी कणखार झाला आहे.त्याने राजकारणात वैयक्तिक टीका सहन केली आहे.त्याची सहनशीलता आणि दृढतेचा मला अभिमान आहे.त्याच्या नेतृत्वात परिवर्तन होईल’असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.

काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधींकडे सोपवल्यानंतर ,मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राहुल यांना शुभेच्छा आणि अशिर्वाद दिला. यावेळी सोनियांनी काँग्रेसच्या इतिसहासावर प्रकाशझोत टाकला त्या इंदिरा आणि राजीव गांधींच्या आठवणीने भावुक झाल्या. सोनिया म्हणाल्या, ‘इंदिरांनी मला मुलीसारखे स्वीकारले.भारताच्या संस्कृती ओळख करून दिली.1984मध्ये त्यांची हत्या झाली, त्यावेळी माझी आई माझ्यापासून दुरावल्याची भावना होती’.

राजीव गांधाबाबत बोलताना सोनिया म्हणाल्या, ‘राजीव गांधीशी लग्न झाल्यानंतरच माझा राजकारणाशी संबंध आला,त्यापूर्वी राजकारणाशी माझा संबंध नव्हता मात्र इंदिरांच्या हत्येनंतंर सात वर्षांनी माझ्या पतीचीही हत्या झाली आणि माझा आधार माझ्यपासून हिसकावला.गांधी घराण्यातील प्रत्येकजण या देशासाठी झिजला आहे.’

 

 

 

 

Related posts: