|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » काँग्रेसला ‘गँड ओल्ड अँड यंग पार्टी’ बनवणार : राहुल गांधी

काँग्रेसला ‘गँड ओल्ड अँड यंग पार्टी’ बनवणार : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आगामी काळात काँग्रेसला ‘ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी’बनवणार असल्याचे अश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी दिली. तसेच तरूणांनो एकत्र या,आपण एकतेचे प्रेमाचे राजकारण करू असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचे प्रमाणपत्र देत,सूत्रे सोपवली अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, ‘ आमच्या देशासाठी संघर्ष सुरू राहिल, विरोधकांचा राग आणि संताप आपल्याला बळकट करेल. एकदा आग लागल्यावर ती विझवणे फार कठीण आहे’. भाजपाचे लोक संपूर्ण देशात आग आणि हिंसा पसरवत आहेत, ही हिंसा रोखण्याची ताकद फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. राजकारण जनतेसाठी आहे.पण आज राजकारणाचा उपयोग जनतेसाठी नाही,त्यांच्या विकासासाठी नाही तर त्यांना चिरडण्यासाठी होत आहे,तसेच भाजपशी मतभेद जरी असली तर भाजप कार्यकर्त्यांना आपण भाऊ किंला बहीणच मानतो,ते अवाज दाबातात पण आपण आवाज उठवू,ते प्रतिमा मलिन करतात आम्ही आदर करतो,अशी टीका राहुल गांधींनी भाजपवर केली आहे.

,

 

 

Related posts: