|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » घोटाळय़ातील सर्व संपत्ती सरकारजमा व्हावी ; तेलगीच्या पत्नीची इच्छा

घोटाळय़ातील सर्व संपत्ती सरकारजमा व्हावी ; तेलगीच्या पत्नीची इच्छा 

ऑनलाईन टीम / पुणे :

बनावट स्टॅम घोटाळय़ाती मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीच्या पत्नी शाहीदाने स्टॅम घोटाळय़ातील राहिलेली सर्व मालमत्ता सरकार दरबारी जमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाहिदाने याबाबतचा अर्ज वकिलांमार्फत पुणे सत्र न्यायालयात दाखल केला आहे.

बनावट स्टॅम्प घोटाळय़ाचा तपास करताना सीबीआयने तेलगीच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या.मात्र कर्नाटकमधील नऊ मालमत्ता अजूनही तेलगीची पत्नी शाहिदा आाrण कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे आहेत.यामध्ये मोकळय़ा शेतजमिनी,कमर्शियर कॉम्पलेक्स फ्लॅट्स यांचा सामवेश आहे.

तेलगीला सना नावाची एक मुलगी आहे.परंतु स्टॅम्प घोटाळय़ातून कमावलेली मालमत्ता आपल्या कुटुंबाला नको,असे शाहिदाचे म्हणणे आहे.सीबीआयने या नऊ मालमत्ता जप्त कराव्यात आणि पुढे त्या सरकारजमा कराव्यात,असे शाहिदाने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.तसेच शाहिदा अनेक वर्षांपासून वेगवेगळय़ा आजरांनी त्रस्त आहे.आपल्या हयातीतीच स्टॅम्प घोटाळय़ातून कमावलेली सर्व मालमत्ता सरकारजमा व्हावी अशी इच्छा तीने व्यक्त केली आहे.

 

 

 

Related posts: