|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अखेर रस्त्याच्या कामासाठी मोजणी सुरु

अखेर रस्त्याच्या कामासाठी मोजणी सुरु 

प्रतिनिधी/ सातारा

भाजपाच्या नगरसेविका सौ. आशा पंडित यांच्याकडे सातत्याने माची पेठेतील अर्थ हिल सोसायटीला रस्ता मिळावा अशी मागणी होत होती. त्यानुसार पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करुन मंजूरी मिळवली अन् त्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष मोजणी करुन सुरुवात झाली.

शहरातील माची पेठ 85, 86, 87 येथील बरेच वर्षा पासून रखडलेल्या रस्त्यासाठी नगरसेविका सौ.आशा पंडित यांचा पाठपुरावा सुरु होता. पालिकेतून रस्त्याची मंजूरी मिळवली. रस्ते विकास मधून 5 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्या कामास रितसर मोजणी करण्यात आली. नगरपालिकेच्या आभियंत्या सौ. साबळे यांचे सहकार्य लाभले. या कामासाठी भाजपाचे किशोर पंडित, अर्थ हिल आपार्टमेंटचे अध्यक्ष प्रताप लोहार, सचिव दीपक शेडगे, खजिनदार गणेश लोहार, सदस्य सचिन तुपे, महेश लोहार, संजय माने तसेच पेठेतील तरुण व जेष्ठ नागरिक यांच्या पाठपुराव्या मूळे या कामास गती मिळाली. हे काम येत्या 15 दिवसात चालू होईल अशी माहिती सौ. पंडित यांनी दिली.