|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापसा येथे सहा किलो चरस जप्त

म्हापसा येथे सहा किलो चरस जप्त 

दिल्लीतील एका संशयातला अटक अमली पदार्थ विरोधी विभागाची कारवाई

प्रतिनिधी/ पणजी

गोवा पोलीस खात्याच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) केलेल्या कारवाईत 6.20 किलो चरस जप्त केला असून एका संशयिताला अटक केली आहे. संशयिताविरोधात एनडीपीएस कायदा 1985, 20 (बी) (2) (सी) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. आज सोमवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक पेलेल्या संशयिताचे नाव राज शर्मा (32, दिल्ली) असे आहे. ही कारवाई 16 डिसेंबर रोजी रात्री 8.40 ते 12.30 दरम्यान म्हापसा येथील गांधी सर्कलजवळ करण्यात आली आहे. सुमारे 6.20 किलो चरस जप्त करण्यात आला असून बाजारभावाप्रमाणे त्याची किमंत 18 लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये इतक्या मोठय़ाप्रमणात चरस जप्त करण्याची ही सर्वात मोठी कारवाई आहे, उपनिरीक्षक मंजूनाथ नाईक पुढील तपास करीत आहेत.

उपनिरीक्षक मंजूनाथ नाईक व दितेंद्र नाईक, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, नीतेश मुळगावकर, सुशांत पागी, रुपेश कांदोळकर, नीतेश नाईक यांनी ही कारवाई केली.

एएनसीकडे पोलीस कर्मचाऱयांची कमतरता

पोलीस खात्याचा एनएनसी विभाग हा केवळ ड्रग्ज विरोधात कारवाई करीत असला तरी त्यांच्याकडे पोलीस कर्मचाऱयांची खूपच कमतरता असल्याचे दिसून येत आहे. केवळ 11 पोलीस कर्मचारी हा विभाग सांभाळत आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून राज्यातील पर्यटन हंगामाला खऱया अर्थाने सुरुवात होत असते याकाळात पर्यटक मोठय़ाप्रमाणात गोव्यात येत असतात. देशी विदेशी पर्यंटकांनी गोवा खच्च भरलेला असतो. डिसेंबर महिन्यात अनेक पाटर्य़ांचे आयोजन केले जाते अशा काळात ड्रग्जचा व्यवसाय मोठय़ाप्रमाणात होत असतो. अशा वेळी एएनसी विभागाकडे जादा स्टाफ असणे फार महत्वाचे असते त्यासाठी आम्ही जादा पोलीस मागितले असल्याचे एएनसी अधीक्षक उमेश गावकर यांनी सांगितले. 

राज्यातील ड्रग्ज पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सरकारी यंत्रणे सज्ज झाली आहेत. गोवा पोलीस, त्यांच्या सोबत एएनसी विभाग, एनसीबी, कस्टम, अबकारी खाते  ड्रग्स विरोधात करीत आहेत. 

एएनसी पोलिसांना विशेष पुरस्कार जाहीर

या वर्षीच्या पर्यटन हंगामात अमलीपदार्थ विरोधी विभागाने आत्तापर्यंत चांगली कामगीरी केली असून एएनसी पोलीस कौतुकास पात्र ठरत आहेत. डिसेंबर महिन्यात राज्यात अनेक पाटर्य़ा होत असतात, त्यासाठी मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारचा ड्रग्ज गोव्यात येत असतो. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच एएनसी पोलिसांनी विशेष कारवाई करून मोठय़ाप्रणात एलएसडी व चरस जप्त केला आहे. एएनसी पोलासंना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याचे एएनसी अधीक्षक उमेश गावकर यांनी सांगितले.

Related posts: