|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » अमेरिका भ्रमंती करणाऱया भारतीयांच्या संख्येत घट

अमेरिका भ्रमंती करणाऱया भारतीयांच्या संख्येत घट 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2017 च्या पहिल्या सहा महिन्यांत अमेरिकेला भेट देणाऱया भारतीयांच्या संख्येत 13 टक्क्यांनी घसरण नोंदविण्यात आली आहे. नोटाबंदी आणि अमेरिकेकडून व्हिसा देण्याची प्रक्रिया ताटकळत ठेवण्याने हा परिणाम झाल्याचे पर्यटन तज्ञांचे म्हणणे आहे. जानेवारी ते जून दरम्यान भारतीय पर्यटकांच्या संख्येत 12.9 टक्क्यांनी घट झाली तर एप्रिल, मे आणि जूनमध्ये ही संख्या 18.3 टक्क्यांनी घसरली.

भारतीय पर्यटकांच्या संख्येत झालेली घट ही काही काळापुरती मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षभरात भारताकडून धोरणात बदल करण्यात आल्याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येत दिसून आला. जीएसटी आणि नोटाबंदी यांचाही परिणाम झाला आहे. निर्वासितविरोधी अमेरिकेने धोरण स्वीकारल्याने त्याचा फटका बसल्याची अपेक्षा नाकारण्यात आली आहे. 2016 मध्ये 1.17 दशलक्ष भारतीयांनी अमेरिकेला भेट देत 13.6 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न दिले होते. वर्षाच्या आधारे त्यात 14 टक्क्यांनी वाढ झाली होती. 2016 च्या तुलनेत 2021 मध्ये भारतातून 8,14,000 पर्यटक भेट देतील असे सांगण्यात आले आहे.

Related posts: