|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » फलंदाजांच्या मानांकनात रोहित पाचव्या स्थानी

फलंदाजांच्या मानांकनात रोहित पाचव्या स्थानी 

वृत्तसंस्था/ दुबई

सोमवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा सलामीचा फलंदाजी रोहित शर्माने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. लंकेविरूद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱया सामन्यात रोहितने द्विशतक झळकविले होते.

वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत तीन द्विशतके नोंदविले आहेत. लंकेविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना शर्माने दर्जेदार कामगिरी केली. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकानी जिंकून आयसीसीच्या वनडे सांघिक मानांकनात 119 गुणांसह दुसरे स्थान राखले आहे. या ताज्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिका 121 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. रोहित शर्माने पहिल्यांदाच शानदार कामगिरीच्या जोरावर 800 गुणांचा टप्पा ओलांडला. भारताने लंकेविरूद्धची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली असती तर त्यांना 2017 अखेरीस सांघिक वनडे मानांकनात पहिले स्थान मिळू शकले असते.

वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत शिखर धवनने 14 वे स्थान मिळविले आहे. या यादीत भारताचा विराट कोहली 876 गुणांसह पहिल्या स्थानावर असून द.आफ्रिकेचा डिव्हिलीयर्स 872 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. रोहित शर्मा 816 गुणांसह पाचव्या स्थानावरआहे.

वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या चहालने 23 वे स्थान मिळविले आहे. लंकेविरूद्धच्या मालिकेत त्याने 6 गडी बाद केले. कुलदीप यादव 56 व्या तर हार्दिक पांडय़ा 45 व्या स्थानावर आहे. लंकेचा लकमल 22 व्या स्थानावर असून अँजेलो मॅथ्युज 45 व्या स्थानावर आहे..

Related posts: