|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सौंदत्ती येथे 2 लाखाची घरफोडी

सौंदत्ती येथे 2 लाखाची घरफोडी 

प्रतिनिधी / बेळगाव

कुंबार गल्ली सौंदत्ती येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी 1 लाख 92 हजार 700 रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने व इतर ऐवज लांबविला आहे. या संबंधी रविवारी सौंदत्ती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा बसाप्पा पत्तार (वय 55) या सुवर्ण कारागिराच्या घरात चोरी झाली आहे. 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता आपल्या घराला कुलूप लावून कृष्णा व कुटुंबिय गावी गेले होते. 13 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता ते गावातून परतले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.

चोरटय़ांनी बेडरुममधील दोन तिजोरी फोडून 72 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 किलो 300 ग्रॅम चांदी, बॅग, इन्वटर, दोन मनगटी घडय़ाळे आदी वस्तू चोरल्या आहेत. सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस चोरटय़ांचा शोध घेत आहेत.