|Monday, September 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » व्होडाफोनची बंपर ऑफर , वापरा 84 दिवस अनलिमिटेड डेटा

व्होडाफोनची बंपर ऑफर , वापरा 84 दिवस अनलिमिटेड डेटा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

व्होडाफोन इंडियाने आपल्या ’सुपर प्लान’ सिरीज अंतर्गत अंतर्गत नवा टॅरिफ प्लान आणला आहे. या नव्या प्लानची तुलना एअरटेलच्या ’प्री-पेड प्रॉमिस टॅरिफ प्लान’सोबत केली जात आहे. या नव्या प्लॅनमध्ये तुम्ही 84 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे.

व्होडाफोनने काही ठीकाणी 200 रुपयाच्या आतले प्लॅन लॉन्च केल्यानंतर आता काही नवे प्लॅन आणले आहेत. व्होडाफोनने सुपर प्लान्स लाइनअपमध्ये 409 रुपये आणि 459 रुपयाचे दोन नवे प्लॅन आणले आहेत.जिथे व्होडाफोन 3 जी/4जी कवरेज नाहीए तिथे व्होडाफोन सुपर प्लान स्किम पोहोचविणे हे या प्लानचे उद्धीष्ट आहे. वोडाफोनच्या 409 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलसोबत 2जी डेटा दिला जात आहे. याशिवाय 70 दिवसांच्या वॅलिडीटी प्लॅनमध्ये दररोज 2 जी डेटा दिला जात आहे. त्याशिवाय 70 दिवसांच्या वॅलिडिटी प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. 459 रुपयांच्या प्लॅनचे सर्व फायदे यामध्ये असणार आहेत. फक्त यामध्ये प्लान्सची वॅलिडीटी 84 दिवसांची राहणार आहे.