|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » जवानांबद्दलचे अपशब्द आमदाराला पडले महागात

जवानांबद्दलचे अपशब्द आमदाराला पडले महागात 

 पुंछ

 जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथे जवानांच्या विरोधात अपशब्द उच्चारणे एका आमदाराला चांगलेच महागात पडले. आमदाराने जवानांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली असता तेथे उपस्थित पोलीस अधीक्षक राजीव पांडे यांनी त्यांना गप्प बसविले. यावेळी आमदार आणि अधीक्षक यांच्यात वादावादी देखील झाली. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमांवर मोठय़ा वेगाने प्रसारित होतेय. एका कार्यक्रमात नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद राणा यांनी जवानांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. कार्यक्रमात हजर असलेले पोलीस अधीक्षक पांडे यांनी या टिप्पणीवर हरकत नोंदविली. तुम्ही जे म्हणत आहात, ते चुकीचे असल्याचे पांडे यांनी आमदाराला सुनावले.

यानंतर दोघांमध्ये उपस्थित जमावासमोरच वादावादी सुरू झाली. यावेळी आमदारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी देखील केली. आमदाराची याप्रकारची टिप्पणी लज्जास्पद असून त्याने माफी मागितली पाहिजे अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्यक्त झाली. लोकांनी पोलीस अधीक्षकाचे कौतुक देखील केले.

Related posts: