|Friday, December 6, 2019
You are here: Home » leadingnews » मोदींनी बोरिंग भाषणे देण्याऐवजी राजकारणातून रिटायर व्हावे : जिग्नेश मेवाणी

मोदींनी बोरिंग भाषणे देण्याऐवजी राजकारणातून रिटायर व्हावे : जिग्नेश मेवाणी 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आता वय झाले असून त्यांनी जुने बोरिंग भाषणं देशाला ऐकवत आहेत. त्यांनी ही भाषणं देण्यापेक्षा राजकारणातून ब्रेक घ्यावा. रिटायर व्हावे,’ अशी टीका गुजरातमधील दलित नेते आणि नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केली आहे. मेवाणी हे गुजरातच्या वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ’मोदींनी जुनी भाषणे देण्यापेक्षा हिमालयात जाऊन आपली हाडे झिजवावीत,’ अशी टिकाही त्यांनी केली. मेवाणी यांच्या टीकेनंतर तुम्ही या विधानावर खेद व्यक्त करणार आहात का? असा प्रश्न या वृत्तवाहिनीने त्यांना विचारला. मेवाणी यांनी त्याला नकारार्थी उत्तर दिले. ’उद्या राहुल गांधी यांनी जरी मला हे विधान मागे घ्यायला सांगितले तरी मी माझ्या वक्तव्यावरून तसूभरही मागे हटणार नाही. माझ्या विधानावर माफी मागणार नाही,’ असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

 

Related posts: