|Friday, February 28, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » अवघ्या 1590 रूपयात व्होडाफोन ‘ए 20’स्मार्टफोन

अवघ्या 1590 रूपयात व्होडाफोन ‘ए 20’स्मार्टफोन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

व्होडाफोन आणि आयटेल या दोन टेलिकॉम कंपन्या एकत्र येत 4उ स्मार्टफोन आणला आहेत. ‘ ए20’ असे या स्मार्टफोनचे नाव असून, किंमत जिओ फोन आणि एअरटेल इंटेक्स ऍक्वा लायन्स एन1 या स्मार्टफोनच्या किंमतींएवढी आहे.

व्होडाफोन-आयटेलच्या ‘ए20’चे फीचर्सही आकर्षक आहेत. एक जीबी रॅम आणि 4 इंचाचा  WVGA डिस्प्ले या स्मार्टफोनला आहे. ‘ए20’ स्मार्टफोनची मूळ किंमत 3,690 रुपये आहे. मोबाईल खरेदी करण्यावेळी ही पूर्ण किंमत द्यावी लागेल. मात्र यावर 2,100 रुपयांचं कॅशबॅक आहे. मात्र कॅशबॅकची रक्कम मोबाईल खरेदी केल्याच्या 18 महिन्यांच्या अंतराने मिळेल. म्हणजेच 18 महिन्यांनी 900 रुपये, त्यानंतरच्या 18 महिन्यांनी 1200 रुपये. त्यामुळे तसे पाहायला गेल्यास, हा स्मार्टफोन 1,590 रुपयांना पडतो. त्याचसोबत, या स्मार्टफोनसाठी प्रत्येक महिन्याला 150 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. हे रिचार्ज 36 महिने करावे लागेल. ज्यांना शक्मय आहे, ते 36 महिन्यांचे रिचार्ज आधीच एकत्रित करु शकतात. म्हणजे एकत्रित रिचार्ज केल्यास 5,400 रुपये भरावे लागतील. या स्मार्टफोनसाठीच्या या सर्व ऑफर 31 मार्च 2018 पर्यंत उपलब्ध असतील.

 

 

Related posts: