|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » बिहारमध्ये साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट ;चौघांचा मृत्यू

बिहारमध्ये साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट ;चौघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पाटणा  :

बिहारमधील गोपाळगंज येथील एका साखर कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन चार मजुरांचा मृत्यू झाला आहे तर,अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

बिहारमधील गोपालगंज जिह्यातील चौकोर भागात असलेल्या सासमुसा साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला. ओव्हरहीटींगमुळे बॉयलरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. बॉयलरचा स्फोट झाला त्यावेळी जवळपास 100 कामगार डय़ूटीवर होते. बॉयलर पाईपमध्ये स्फोट झाल्यानंतर धावपळ उडाल्याचा दावा एका मृताच्या नातेवाईकाने केला आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱयाखाली काही जण अडकल्याची भीती असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.