|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » गोंधळामुळे सचिन तेंडूलकरांचे राज्यसभेतील पहिले भाषण थांबले

गोंधळामुळे सचिन तेंडूलकरांचे राज्यसभेतील पहिले भाषण थांबले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर प्रथमच संसदेमध्ये भाषण देण्यासाठी उभा झाला. पण विरोधकांच्या गोंधळामुळे सचिनला आपले भाषण थांबाववे लागले.तो एक शब्दही बोलू शकला नाही. काँग्रेस आणि भाजपचे मेंबर्स 2जी प्रकरणात सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने दिलेल्या निर्णयाबाबत बोलत होते. त्यानंतर राज्यसभेचे खासदार व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित केले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदार आहे. सचिन खूप दिवसांनंतर पहिल्यांदाच राज्यसभेत बोलणार होता. ‘राईट टू प्ले’ असा त्याचा विषय होता. त्यामुळे सचिन काय बोलणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र राज्यसभेत सुरू असलेल्या गोंधळामुळे तो काही बोलू शकला नाही. यावेळी, गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंह यांचे नाव घेत आरोप केले होते. त्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार आज राज्यसभेत आक्रमक झाले होते आणि मोदींनी माफी मागावी, अशी मागणी करत होते. या संपूर्ण गदारोळात सचिन तेंडुलकरला बोलताही आले नाही.