|Friday, November 15, 2019
You are here: Home » उद्योग » महाराष्ट्रात 30 जानेवारीपासून एअरसेलची सेवा बंद

महाराष्ट्रात 30 जानेवारीपासून एअरसेलची सेवा बंद 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

एअरसेल ही दूरसंचार क्षेत्रातील कंपनी 30 जानेवारीपासून महाराष्ट्रातील आपला व्यवसाय बंद करणार आहे. कंपनीकडून दूरसंचार नियामक ट्रायला देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह 6 सर्कलमधून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक दुसऱया कंपनीकडे पोर्ट करण्यास सांगण्यात आले आहे.

एअरसेल लिमिटेड आणि दिश्नेत वायरलेस लिमिटेड यांच्याकडे एअरसेलची माहिती आहे. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पश्चिममधील कंपनीला परवाना 1 डिसेंबर रोजी संपुष्टात आला आहे. दुसऱया नेटवर्कमध्ये मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यासाठी ग्राहकांना 10 मार्च 2018 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यादरम्यान ग्राहकांना आपला क्रमांक दुसऱया कंपनीमध्ये पोर्ट करण्यासाठी कंपनीकडून मदत करण्यात येईल असे ट्रायने म्हटले. 1 डिसेंबर 2017 रोजी कंपनीचा परवाना संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ करण्याचा कंपनीकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या 6 सर्कलमध्ये कंपनीचे साधारण 40 लाख 2जी ग्राहक आहेत.

 

 

 

Related posts: