|Thursday, September 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » रिलायन्स जिओचा धमाकेदार ‘हॅप्पी न्यू इयर 2018’ प्लॅन

रिलायन्स जिओचा धमाकेदार ‘हॅप्पी न्यू इयर 2018’ प्लॅन 

ऑनलाईन टीम / मुंबई  :                                                            

रिलायन्स जिओच्या प्रीपेड ग्राहकांनी शुक्रवारी दोन नव्या प्लॅनची घोषणा केली आहे. या नव्या प्लॅनला ’ हॅप्पी न्यू इयर 2018 प्लॅन’ असे घोषित करण्यात आले आहे. या मधील एक प्लॅन 199रूपयांचा तर दुसरा 299 रूपयांचा प्लॅन घोषित केला आहे.

199 च्या प्लॅनमध्ये प्राईम ग्राहकांना 28 दिवसांसाठी प्रतिदिन 1.2 जीबी 4 जी डाटा मिळणार आहे. तर 299 च्या प्लॅनमध्ये जिओच्या प्राईम ग्राहकांनाअ प्रअतिदिन 2 जीबी 4 जी डाटा मिळणार आहे. हा प्लॅनदेखील 28 दिवसांचा असेल. सोबतच ग्राहकांना सारे जिओ अ??प, व्हॉईस कॉल आणि एसएमएस निशुल्क मिळणार आहेत. यासोबतच जिओचा 399,499,459 आणि 509 रूपयांचे विविध प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्याची व्हॅलिडीटी, डाटा आणि फायदे हे वेगवेगळे आहेत.