|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी 

ऑनलाईन टीम / रांची  :

चारा घोटाळय़ाप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला असून, येत्या 3 जानेवारीला शिक्षेची सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने लालू प्रसाद यादवांसह 15 जणांना दोषी ठरवले आहे. या निकालाने काँग्रेस पक्षाला दिलासा दिला आहे. याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते जगन्नाथ मिश्रा यांच्यासह इतर सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. येत्या 3 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. मात्र तोपर्यंत लालूप्रसाद यादव यांचा मुक्काम तुरूंगातच असणार आहे. कोटय़वधी रूपयांचा चारा घोटाळा देशभरात चांगलाच गाजला होता. त्यामुळे लालू प्रसाद यादवांना आपले पद गमवावे लागले होते. या प्रकरणी आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. यात लालू यादवांना न्यायालयाने दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आता काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

Related posts: