|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » शिर्डी आणि पंढरपुरात भक्तांची तुफान गर्दी

शिर्डी आणि पंढरपुरात भक्तांची तुफान गर्दी 

ऑनलाईन टीम / शिर्डी :

सलगच्या सुट्टया आणि नव्या वर्षानिमित्त असंख्य साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरु ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. याशिवाय भक्तांना थांबण्यासाठी तात्पुरत्या मंडपांचीही सोय करण्यात आली आहे.तर दुसरीकडे पंढरपुरातही भक्तांचा महापूर पहायला मिळत आहे.

नाताळच्या सुट्टयांमध्ये नेहमीच गर्दीचा उच्चांक होत असतो. यंदा शनिवार , रविवार त्यासोबत सोमवार नाताळ अशी सलग सुट्टी आल्याने शिर्डीत भक्तीचा मळा फुलला आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर आज रात्री आणि 31 डिसेंबरला या दोन दिवशी साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठीही शिर्डी वाहतूक शाखेने महत्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविक शिर्डीत येत असल्याने संस्थानने अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ठिकठिकाणी अतिरिक्त निवास व्यवस्था, मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.