|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » आवाजाच्या जादूगराला गूगलचा सलाम

आवाजाच्या जादूगराला गूगलचा सलाम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दिवंगत गायक मोहम्मद रफी यांची आज 93 वी जयंती आहे. आपल्या आवाजाने तमाम कानसेनांना मंत्रमुग्ध करणाऱया या गायकाला गूगलने डूडलच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे.

मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील कोटला सुल्तान सिंह गावात झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रफींनी आपल्या सुरेल आवाजाने साऱया भारतीयांना मंत्रमुग्ध केले. लाहोरमध्ये उस्ताद वाहिद खान यांच्याकडून रफींनी संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर गुलाम अलीखान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे त्यांनी शिक्षण घेतले.

हिंदी सिनेसृष्टीतील गायकांपैकी सर्वश्रे÷ गायकांच्या यादीत मोहम्मद रफीं®ां नाव घेतलं जातं. संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. या पुरस्कारांपेक्षा त्यांना अपेक्षित असलेला रसिकवर्ग त्यांना मोठय़ संख्येने लाभला. 31 जुलै 1980 रोजी जादूगाराचे हृदयविकाराच्या झटक्मयाने निधन झाले. मात्र आवाजाच्या रुपातून रफी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.

 

 

 

 

Related posts: