|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वरिष्ठ न्यायालयात लालूंना न्याय मिळेल !

वरिष्ठ न्यायालयात लालूंना न्याय मिळेल ! 

पाटणा :

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळय़ा प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मात्र पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जात लालूंना वरिष्ठ न्यायालयात न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

वंचितांमध्ये लालूप्रसाद हे लोकप्रिय असून ते खऱया अर्थाने लोकनेते आहेत. तर तेजस्वी यादव हे प्रामाणिक, बुद्धिमान आणि परिपक्त नेते ठरले आहेत. लालूंच्या पूर्ण कुटुंबाने न्यायासाठी लढाई लढावी, वरिष्ठ न्यायालयात दाद मागितल्यास न्या मिळेल असे वक्तव्य सिन्हा यांनी केले.

प्रसारमाध्यमांनी कोणत्याही सरकारचे हस्तक म्हणून काम करू नये. एका लोकनेत्याची प्रतिमा बिघडविली जाऊ नये. असे केल्यास लालूंसाठी जनतेच्या मनात सहानुभूतीच निर्माण होईल, कायद्याला त्याचे काम करू द्यावे असे सिन्हा म्हणाले.