|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘तरूण भारत’च्या रौप्यमहोत्सवी सांगली आवृत्तीचा आज स्नेहमेळावा

‘तरूण भारत’च्या रौप्यमहोत्सवी सांगली आवृत्तीचा आज स्नेहमेळावा 

प्रतिनिधी /सांगली :

वाचकांशी किंमतीपलिकडचे नाते जपणाऱया आणि सीमालढय़ातील अग्रेसर दैनिक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या ‘तरूण भारत’ सांगली आवृत्तीचा 25 वा वर्धापनदिन सोमवार, 25 डिसेंबर रोजी मोठय़ा उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने डॉ. बापट बाल शिक्षण मंदिराच्या क्रीडांगणावर सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळय़ाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलनाने करण्यात येणार आहे.

काही स्नेहबंध इतके अतुट असतात की जणू स्पंदने, ‘तरूण भारत’चेही  असंच आहे. वाचकांसोबत असणारं त्याचं नातं अतूट आहे. सांगलीत 25 वर्षापूर्वी ‘तरूण भारत’चे आगमन झाले आणि ‘तरूण भारत’ सांगलीकरांचा झाला. या गोडसंबंधाची ही 25 वर्ष कशी पार पडली हे कळलंच नाही. वाचकांच्या या विश्वासाच्या वाटचालीचा हा रौप्यमहोत्सवी गौरवसोहळा सोमवारी मोठय़ा धुमधडाक्यात साजरा होत आहे. दीपप्रज्ज्वलन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, इस्लामपूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे, ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकार प्राची गोडबोले, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या सर्वांचे स्वागत ‘तरूण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, संपादक जयवंत मंत्री व सीईओ दीपक प्रभू करणार आहेत.

Related posts: