|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नाताळनंतर म्हादई लढा पुन्हा तीव्र होणार

नाताळनंतर म्हादई लढा पुन्हा तीव्र होणार 

प्रतिनिधी /पणजी :

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकाचे भाजपानेते येडीयुराप्पा यांना पत्र पाठविल्यामुळे म्हादईचा लढा लढणाऱया म्हादई बचाव अभियानाचे नेते सावध झाले आहेत. म्हादईच्या रक्षणासाठी पुन्हा लढाई लढण्याची तयारी अभियानाने केली आहे. म्हादईचा लढा पुन्हा लोकापर्यंत पोचविण्याची तयारी सुरु झाली आहे. सध्या राज्यात नाताळ उत्सव सुरु असल्याने त्याला कोणतीही बाधा न आणता नाताळ संपल्यानंतर नववर्षात आंदोलन करण्याची तयारी अभियानने केली आहे.

कर्नाटकला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी चर्चेची तयारी गोवा सरकारने दर्शविल्याने म्हादई बचाव अभियानचे नेते तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. अभियानच्या नेत्या सौ. निर्मला सावंत, पर्यावरणवादी नेते प्रा. राजेंद्र केरकर तसेच शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत आणि अन्य संबंधित नेते पर्रीकरांच्या भूमिकेमुळे सावध झाले आहेत. म्हादईची लढाई गोवा जिंकणार हे निश्चित झाले असताना भाजप सरकारने अचानकपणे घेतलेल्या भूमिकेमुळे म्हादई बचाव अभियानचे नेतेही संभ्रमात सापडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी येडीयुराप्पाना पाठविलेल्या पत्रामुळे लवादाकडे असलेल्या प्रकरणावर विपरित परिणाम होणार नाही ना? अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

नाताळनंतर करणार लढा तीव्र

पर्रीकरांनी येडीयुरप्पा यांना पत्र पाठविल्यानंतर अभियानने पणजीत घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र हे निर्णय उघड करण्यात आले नाहीत. राज्यात नाताळ उत्सव सुरु असल्याने आंदोलन लगेच सुरु करावे की नंतर असाही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राज्यात नाताळ उत्सव ख्रिश्चिन बांधव मोठय़ा उमेदीने साजरा करीत असल्याने त्याला बाधा पोचू नये, असा विचार करून  आंदोलन नववर्षात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाताळ हा ख्रिश्चनांचा एकमेव मोठा सण असल्याने व ख्रिश्चन बांधव गोव्याच्या हिताच्या प्रत्येक प्रश्नावर सहकार्य देत असल्याने नाताळ काळात आंदोलन न करण्याचे ठरविण्यात आले आहे.

सहा जानेवारीनंतर आंदोलनाचा ठोस निर्णय

नववर्षातील पहिल्या आठवडय़ात 5 जानेवारीपर्यंत हा उत्सव चालतो. त्यामुळे 6 जानेवारीनंतर आंदोलनाबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असून आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. अभियानच्या नेत्या सौ. सावंत व अभियानचे अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते याच्यात याबाबत चर्चा झाली आहे. सरकारने आपली भूमिका बदलली नाही तर जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात म्हादई बचाव अभियानचे आंदोलन पुन्हा सुरु होणार आहे.

Related posts: