|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » १६ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेऱ्यासह जिओनीचा नवा स्मार्टफोन

१६ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेऱ्यासह जिओनीचा नवा स्मार्टफोन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जिओनीने नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आलेला  Gionee S10  मधील व्हेरिएंट आहे. कंपनीने भारतात या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी असून हा फोन गोल्ड आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.

ड्युअल सिमवाल्या या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 7.1 नॉगट आहे. यात 5.2 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसह 1.4 गिगाहर्टझ क्वाडकोर स्नॅपड्रगन 427 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सेल रेयर कॅमेरा तर सेल्फीप्रेमींसाठी 16 मेगापिक्सेल प्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इंटरनल मेमरी 32 जीबी असून 256 जीबीपर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी  VoLTE , वायफाय, ब्लूटूथ, एफएम रेडिओ, मायक्रो यूएसबी आणि 3.5mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.

 

 

 

Related posts: