|Friday, February 28, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 31 डिसेंबरनंतर या मोबाईलवर होणार व्हॉट्सऍप बंद

31 डिसेंबरनंतर या मोबाईलवर होणार व्हॉट्सऍप बंद 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

व्हॉर्टंसऍप यूजर्ससाठी ही अत्यंत म्हत्वाची बातमी आहे.कारण आता व्हॉट्सऍप या वर्षाअखेर काही फोनवर काम करणं बंद होणार आहे. आऊटडेटेज व्हर्जनला व्हॉट्सऍप सपोर्ट करणार नाही, असे कंपनीने एका ब्लॉगद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षात व्हॉट्सऍप वापरायचे असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन बदलावे लागणार आहेत.

या फोनमध्ये ब्लॅकबेरी ओएस, ब्लकबेरी 10, विंडोज फोन 8.0 आणि जुन्या व्हर्जनचा समावेश आहे, ज्यामध्ये व्हॉट्सऍप सपोर्ट करणार नाही. आऊटडेटेड व्हर्जनला व्हॉट्सऍप सपोर्ट करणार नाही, असे कंपनीने यापूर्वी 2016 मध्येही जाहीर केलं होतं. मात्र ती डेडलाईन नंतर 30 जून 2017 पर्यंत वाढवण्यात आली होती,मात्र ती 31 डीसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती त्यामुळे आता पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली 31 डिसेंबरची डेडलाईनही संपणार आहे. हा निर्णय कंपनीसाठी कठोर आहे. मात्र व्हॉट्सऍपचा आणखी चांगला अनुभव देण्यासाठी ही अपडेट देणे गरजेचे असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

या फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही

    • नोकिया सिम्बियन S60
    • ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी 10
    • विंडोज फोन 8.0 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स
    • नोकिया S40
  • अँड्रॉईड 2.3.7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स

Related posts: