|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गरीबांच्या देवदर्शनाची झाली विक्री

गरीबांच्या देवदर्शनाची झाली विक्री 

एजंट आणि समिती सदस्याच्या संगनमताने नाताळात झाली बेकायदा 3 लाखांची उलाढाल

पंढरपूर / प्रतिनिधी

    आजपर्यत आपण अमुक एक वस्तू विकली , किंवा वेगळेकाहीतरी विकले. असे ऐकले असेल. पण चक्क सामान्य माण्साचा आणि शेतक-यांचे दैवत असणा-या विठठलांच्या दर्शनाची विक्री झाली. ही घटना पहील्यांदाच ऐकत असाल…

    नुकत्याच दिन दिवसांची सुटटी झाली. तसेच सरते वर्षे संपून नविन वर्षाचे स्वागत करण्यांची देखिल सर्वत्र चाहूल लागली आहे. अशामधेच अनेक भक्तांनी तसेच पर्यटकांनी विठठल दर्शनाला पसंती दिली. यामधेच नुकत्याच झालेल्या नाताळाच्या तीन दिवसीय सुटटयामधे सुमारे 1 लाखांहून अधिक भाविक दररोज येत होते. यामधे अनेक भाविक हे पदस्पर्श दर्शनाच्या रांगेमधे उभे राहून दर्शन घेत होते. तर काही भाविकांनी चक्क एजंटाच्या करवी काही मिनिटांमधेच तथाकथित व्हीआयपी म्हणून दर्शन घेण्यास पसंती दर्शवत होते. यामधे साधारणपणे एका भाविकांसाठी 500 ते 700 रूपयापर्यतचे बेकायदा शुल्क आकारले जात होते. यामधे तीन दिवसात दोन ते तीन लाखांची उलाढाल झाली आहे.

   यामधे घडली हकीकत अशी की , पंढरीत भाविक आल्यावर येथील काही गार्डड तसेच काही फ्ढिरते एजंट हे विठठलांचे व्हीआयपी दर्शन होउ शकते. अशी आवई उठवत फ्ढिरत होते. यावेळी काही भाविक व्हीआयपी दर्शनासाठी या एजंटाच्या गळयांला लागल्यावर त्याना चक्क नामदेव पायरी येथे घेउन जात होते. त्यानंतर तेथील एक मंदिर समितीचा झिरो कर्मचारी एका समिती सदस्यांच्या सुचनेवरून सदरच्या भाविकांना व्हीआयपी दर्शन घडवून आणत होता. यामधे तथाकथित एजंटकडून संबधित समिती सदस्यांला 60 टक्के रक्कम देउ करण्यात येत असल्यांचे समजते आहे.

   अशा पध्दतीने शनिवार , रविवार आणि नाताळची सोमवारी आलेली सुटटी.  या तीन दिवसाच्या कालावधीमधे तब्बल 400 ते 450 तथाकथित व्हीआयपी दर्शनास सोडण्यात आले. त्यामुळे आपसुकच पदस्पर्श दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांस दर्शनासाठी विलंब लागत होता.

   या संपूर्ण घडलेल्या घटनेमधे संबधित समिती सदस्य हा गेल्य तीन दिवसामधे मंदिराच्याच आवारामधे वावरत असल्यांची चर्चा आहे. इतकेच काय वेळप्रसंगी सदरचा समिती सदस्य विठठल मंदिर सभामंडपामधे असलेल्या समितीच्या कार्यालयात देखिल ठाण मांडून बसत होते. त्यामुळे निश्चितच हा विठठल दर्शनाच्या बाजारीकरणाचाच विषय असल्यांची चर्चा सध्या मंदिर परिसरात आणि शहरामधे रंगताना दिसत आहे.

  विठठल मंदिरामधे बडवे उत्पात गेल्यापासून एजंटापासून समिती सदस्य , समितीचे काही अधिकारी यांच्यामधे दर्शनाच्या बाजारीकरणाची साखळी असल्यांचे  दिसून येत होते. याबाबत मध्यंतरी तत्कालीन मंदिर समिती व्यवस्थापकांस मारहाण देखिल दर्शनाच्या अर्थकारणावरून झाली होती.

Related posts: