|Sunday, August 18, 2019
You are here: Home » उद्योग » फ्रोनियस इंडियाचा व्यापार दुपटीने वाढवणार

फ्रोनियस इंडियाचा व्यापार दुपटीने वाढवणार 

प्रतिनिधी / मुंबई

फ्रोनियस इंडिया या सोलर पीव्ही स्ट्रींग इन्व्हर्टर, वेल्डिंग उपकरणे आणि बॅटरी चार्जिंग यंत्रणा पुरवणाऱया भारतातल्या अग्रेसर कंपनीने वित्त वर्ष 2019 पर्यंत आपल्या वार्षिक व्यापारात दुपटीने वाढ करण्याचे ध्येय बाळगले आहे. 2013 साली भारतीय बाजारपेठेत प्रवेश केलेल्या या कंपनीची नफात्मक वफद्धी गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने झाल्याचे दिसून आले आहे. येत्या दोन वर्षांत हे आव्हानात्मक ध्येय गाठण्यासाठी, भारताच्या पूर्व व मध्य बाजारपेठांमध्ये असलेली व्यापारसंधी हेरून या बाजारपेठांमध्ये आपल्या सोलर इन्व्हर्टर व्यापाराची व्याप्ती वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे.

बाजारपेठेतील समभागात लक्षणीय वाढ करण्याच्या आपल्या ध्येयाबाबत बोलताना फ्रोनियस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. व्ही. कामथ म्हणाले, ‘सौरऊर्जेशी निगडीत उद्योगक्षेत्रे ज्या झपाटय़ाने फोफावत चालली आहेत, त्यावरून  2019 पर्यंत आम्हाला चांगलाच नफा मिळण्याची लक्षणे दिसून येत आहेत. सध्या बाजारपेठेत आमचा 5.2 टक्के समभाग असून येत्या दोन वर्षांत ही टक्केवारी 20 टक्क्यांपर्यंत पोहोचणे आम्हाला अपेक्षित आहे.

फ्रोनियस इंडिया ही कंपनी सध्या उत्पादन क्षेत्र, ऑटोमोटिव्ह, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रे, सरकारी कार्यालये, शिक्षणसंस्था आणि औद्योगिक कंपन्या आदी क्षेत्रांत सोलार उत्पादने पुरवते. या कंपनीने आजवर पुणे, कोल्हापूर, नाशिक, बेंगळूर, हैद्राबाद, नवी दिल्ली, रांची या शहरांत 100 मेगा वॅटच्या सोलार इन्स्टॉलेशनचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. फ्रोनियसचे सोलर इन्व्हर्टर्स जागतिक दर्जाचे असून यांना 20 वर्षांची वॉरंटी देण्यात येते. भारतातील सौरऊर्जा क्षेत्र हे आता अत्यंत झपाटय़ाने वाढत चालले असून 2022 पर्यंत 100 गिगा वॅट्स सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे सरकारचे ध्येय आहे.