|Sunday, November 17, 2019
You are here: Home » उद्योग » बोरोसीलकडून ‘क्लिप एन स्टोअर’ लंचबॉक्स सादर

बोरोसीलकडून ‘क्लिप एन स्टोअर’ लंचबॉक्स सादर 

प्रतिनिधी/ पुणे

बोरोसीलने लंच बॉक्सेसची क्लिप-एन-स्टोअर श्रेणी बाजारात दाखल केली आहे. हवाबंद सीलमुळे अन्नपदार्थांचा ताजेपणा टिकून राहतो. हे उत्पादनात 100 टक्के बोरोसिलीकेट ग्लासचे बनलेले असल्याने मायक्रोवेव्ह, कन्वेन्शनल ओव्हन, फ्रिजर आणि रेफ्रिजरेटर्समध्ये वापरण्यास सुरक्षित आहे.

तसेच याचे काच मसाला शोषून घेत नसल्याने डाग पडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे वारंवार वापरानंतरही काचेची चमक कमी होत नाही.

आयताकृती, चौकोन आणि वर्तुळाकार आकारांसोबत स्मार्ट उभ्या-आडव्या कॅरीबॅग्ससह विविध आकारात आणि आकारमानात हे उत्पादन उपलब्ध आहे. तसेच रंग पर्यायदेखील उपलब्ध आहेत.

Related posts: