|Sunday, November 17, 2019
You are here: Home » उद्योग » हिमालयाचा मेन फेस ऍन्ड बिअर्ड वॉश बाजारात

हिमालयाचा मेन फेस ऍन्ड बिअर्ड वॉश बाजारात 

प्रतिनिधी / पुणे

हिमालयाने मेन फेस ऍन्ड बिअर्ड वॉश हे नवीन उत्पादन बाजारपेठेत सादर केले आहे. आकर्षक दाढीची आवड असलेल्या पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या हिमालया मेन फेस ऍण्ड बिअर्ड वॉश या उत्पादनात नारळाचे पाणी आणि कोरफडीचा वापर प्रामुख्याने करण्यात आला असून, या दोन्ही घटकांमुळे त्वचेतील खाज जाऊन, त्वचेला मऊपणा येतो व त्वचेचा पोत कायम राखला जातो.

या नवीन उत्पादनाबाबत बोलताना द हिमालया ड्रग कंपनीच्या ग्राहकाभिमुख उत्पादन विभागाचे व्यापार संचालक राजेश कृष्णमूर्ती म्हणाले, गेल्या काही वर्षांत आकर्षक आणि स्पोर्टी लूक देणारी दाढी ठेवण्याचा ट्रेण्ड पुरुषांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येतो.

यामुळे दाढीची वाढ योग्य रितीने राखण्यासाठी खास पुरूषांसाठी असलेल्या विविध ग्रुमिंग उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढली आहे. फेस वॉश उत्पादनांच्या बाजारपेठेतील अग्रेसर कंपनी म्हणून ग्राहकांच्या चेहऱयाच्या त्वचेची व दाढीची नीट काळजी घेतली जाईल, असे उत्कृष्ट उत्पादन ग्राहकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.

येत्या चारच वर्षांत पुरुषांच्या ग्रुमिंग कॅटेगरीतील बाजारपेठेत सीएजीआरची 20 टक्के वाढ होण्याची लक्षणे आहेत.

या कालावधीत, अधिकाधिक स्टायलिश, ट्रेण्डी आणि संशोधनपूर्ण उत्पादने बाजारपेठेत आणून ग्राहकांना अशा आकर्षक उत्पादनांनी खूश करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत.’

Related posts: