|Thursday, November 14, 2019
You are here: Home » उद्योग » नव्या उच्चांकानंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण

नव्या उच्चांकानंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण 

सेन्सेक्स 99 तर निफ्टी 41 अंकांनी आदळले

प्रतिनिधी / मुंबई

आठवडय़ाच्या दुसऱया दिवशी म्हणजे बुधवारी देशी शेअरबाजारात विक्रमी तेजीला गवसणी घातल्यांनतर दुपारच्या सत्रानंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण झाली. सेन्सेक्सने 34,138 चा नवा उच्चांक तर निफ्टीने 10,552 विक्रमी स्तर गाठण्यात यश मिळविले. दिवसअखेर सेन्सेक्स 34,000 च्या खाली तर निफ्टीही 10,500 च्या खाली स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातील नफावसुलीमुळे शेअरबाजारात दबाव दिसून आला. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 0.2 टक्क्यांनी घसरुन 17,673.6 स्तरावर स्थिरावला. तर बुधवारच्या कारभारात बीएसईचा मिडकॅप इंडेक्सने 17,783.8 पर्यंत मजल मारली होती. निफ्टीचा मिडकॅप इंडेक्स 0.1 टक्क्यांनी घसरुन 20,980 च्या स्तरावर स्थिरावला. दिवसभराच्या कारभारात एनएसईचा मिडकॅप 100 इंडेक्स 21,106 पर्यंत पोहोचला होता. बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 0.3 टक्क्यांच्या घसरणीने 19,048.3 स्तरावर बंद झाला.

सेन्सेक्स-निफ्टीची कामगिरी

बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 99 अंक म्हणजे 0.3 टक्क्यांच्या घसरणीने 33,912 स्तरावर बंद झाला. तर एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 41 अंक म्हणजे 0.4 टक्क्यांच्या घसरणीने 10,491 स्तरावर स्थिरावला.

 दिग्गज समभागांची चाल

बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, रियल्टी, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर डय़ुरेबल्स, ऑईल अँड गॅस, पावर या समभागांमध्ये सर्वात अधिक विक्री झाली. निफ्टीच्या पीएसयू बँक इंडेक्समध्ये 0.7 टक्के, ऑटो इंडेक्स 0.5 टक्के आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये 0.3 टक्के घसरण झाली. तर बीएसईच्या रियल्टी इंडेक्समध्ये 0.6 टक्के, कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 0.75 टक्के, कंझ्युमर इंडेक्समध्ये 0.5 टक्के आणि ऑईल अँड गॅस इंडेक्समध्ये 0.8 टक्के घसरण झाली. फार्मा कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी फार्मा इंडेक्स जवळपास 2.5 टक्क्यांनी वधारून स्थिरावला.

काय वधारले? काय घसरले ?

दिवसभराच्या कारभारात सनफार्मा, टेक महिंद्रा, डॉ. रेड्डीज, वेदांता, विप्रो, महिंद्रा आणि एचयुएल 0.2 ते 6.9 टक्क्यांनी वधारले. तर दिग्गज समभागांमध्ये आयओसी, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, एल अँड टी, एसबीआय आणि बजाज यांच्या समभागात 0.8 ते 2.1 टक्के घसरण झाली.

 रिलायन्स कम्युनिकेशन, 3 एम इंडिया, डिवीज लॅब, अदानी पावर, मॅक्स फायनान्शियल यांच्या 3.4 ते 34.75 टक्के तेजी पहायला मिळाली. तर कंसाई नेरोलॅक, आदित्य बिर्ला फॅशन, जेएसडब्ल्यू एनर्जी, एमआरपीएल आणि कंटेनर कॉर्प यांच्या 2 ते 2.5 टक्के घसरण झाली.

Related posts: