|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » आदित्यनाथ यांच्याविरोधातील खटला राज्यपालांकडून मागे

आदित्यनाथ यांच्याविरोधातील खटला राज्यपालांकडून मागे 

लखनौ

 उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्याविरोधात सुरू असलेला 1995 चा एक खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खटल्यात भाजप आमदार शीतल पांडेंसह अन्य दहा लोकांविरोधात गुन्हा दाखल होता. तेव्हा सर्वांवर कलम 144 चे उल्लंघन केल्याचा आरोप होता. वर्ष 1995 मध्ये गोरखपूर जिल्हय़ातील पीपीगंज परिसरात योगी आदित्यनाथ आणि इतर काही जणांनी कलम 144 लागू केलेले असतानाही धरणे आंदोलन केले होते. त्यांच्यावरील हा खटला मागे घेण्यासाठी राज्यपालांकडे विनंती करण्यात आली होती. राज्यपालांनी परवानगी देताच राज्य सरकारने याप्रकरणी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यावर वर्ष 2007 मध्ये गोरखपूर येथे द्वेष पसरवणारे भाषण केल्याचा आरोप होता. पण राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांवर खटला दाखल करण्यास नकार दिला होता.

Related posts: