|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » leadingnews »  कुटूंबियांच्या भेटीवेळी पाकने मानवधिकाराचे उल्लंघन केले : सुषमा स्वराज

 कुटूंबियांच्या भेटीवेळी पाकने मानवधिकाराचे उल्लंघन केले : सुषमा स्वराज 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या भेटीवेळी पाकने केलेल्या ‘नापाक’ कृत्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नाराज व्यक्त करत राज्यसभेत निवेदन दिले आहे. पाकिस्तानने मानवधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना सुषमा स्वराज म्हणाले, “ ही भेट दोन्ही देशांच्या नात्यांसाठी मैलाचा दगड ठरली असती. पण पाकिस्तानने या भेटीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. माध्यमांना जाधव यांच्या आई आणि पत्नी यांच्या जवळ येऊ द्यायची परवानगी नसेल असे ठरले होते. पण पाकिस्तानी माध्यमांना जवळ येण्याची संधी देण्यात आली. सुरक्षेच्या नावावर कपडे बदलायला लावण्यात आले. केवळ साडी परिधान करणाऱया जाधव यांच्या आईला सलवार कुर्ता परिधान करायला लावले.

जाधव यांच्या पत्नीबरोबरच त्यांच्या आईचे मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकली काढायला लावली. बसताच कुलभूषण यांनी विचारले की बाबा कसे आहेत. कपाळावर टिकली आणि मंगळसूत्र नसल्याने कुलभूषण यांना काही बरे वाईट तर झाले नसेल अशी शंका आल्याने त्यांना विचारले.’’

तसेच पुढे बोलतना त्या म्हणाले, ‘मराठीत बोलण्याची संधी देण्यात आली नाही. शेजारी बसलेल्या पाकिस्तानी अधिकाऱयांनी सारखे त्यांना अडवले. त्या मराठीत बोलत राहिल्या तर त्यांचे इंटरकॉम बंद करण्यात आल. सोबत गेलेल्या उप उच्चायुक्तांना मागच्या दाराने नेण्यात आले. त्यामुळे त्यांना कपडे, मंगळसूत्र, बांगडय़ा उतरवण्याच्या प्रकाराबाबत काहीही कळले नाही. अन्यथा त्यांनी विरोध केला असता जाधव यांच्या पत्नीचे बूट ठेवून घेतले आणि त्यात काहीतरी संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. पण दिल्ली आणि दुबईच्या विमानतळावर त्या हेच बूट घालून गेल्या, तेव्हा सिक्मयुरिटी चेकमध्ये तसे काही का आढळले नाही.

दरम्यान, जाधव काहीसे तणावात असल्याचे जाणवत होते असे त्यांच्या पत्नी आणि आईने सांगितले. त्यांना जेवढे सांगितले होते, तेवढेच ते बोलत होते, असे जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीबद्दलही काळजी व्यक्त करण्यात आली. मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचं सांगणाऱ्या पाकने मानवताही दाखवली नाही आणि सद्भावनाही, असे म्हणत  स्वराज यांनी   पाकिस्तानच्या  कृत्यावर  नाराजी आणि  संताप व्यक्त केला.

 

 

Related posts: