|Thursday, September 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » बीएसएनएलचा नवा फीचर फोन लाँच

बीएसएनएलचा नवा फीचर फोन लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई                                         

बीएसएनएलने आपला नवा फीचर फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत फक्त 499 रुपये आहे. ‘डिटेल डी 1’ या कंपनीच्या साथीनं बीएसएनएलने हा नवा फोन लाँच केला आहे.

जिओ आणि एअरटेलच्या फोनप्रमाणे या फीचर फोनमध्ये व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. या फोनसोबत बीएसएनएलचे सिम मिळणार असून पहिले रिचार्ज वर्षभरासाठी वैध असणार आहे. हा प्लॅन 153 रुपयांचा असणार आहे. पण मोबाइलच्या किंमतीतच या प्लॅनची किंमत समाविष्ट असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या फोनसाठी फक्त 499 रुपयेच मोजावे लागतील.बीएसएनएल डिटेल डी1 हा एक बेसिक फोन आहे. हा फोन कॉलिंग आणि मेसेज यासाठी तयार करण्यात आला आहे. हा फीचर फोन जिओप्रमाणे डेटा केंद्रीत नाही. या फोनमध्ये 1.4 इंच स्क्रीन आहे. तसेच हा फोन सिंगल सिम सपोर्ट आहे. या फोनची बॅटरी 650 एमएएच आहे. या फीचर फोनमध्ये एफएम रेडिओ, स्पीकर, टॉर्च यासारखे फीचर देण्यात आले आहेत.