|Thursday, November 14, 2019
You are here: Home » उद्योग » ओएनजीसीचा आता इस्रायलमध्ये प्रकल्प

ओएनजीसीचा आता इस्रायलमध्ये प्रकल्प 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

तेल आणि वायू विषयक सरकारी कंपनी ओएनजीसी विदेश लिमिटेडने इराणला नजरेसमोर ठेवून इस्रायलच्या दिशेने पाऊल टाकले. ओएनजीसीद्वारे इराणमध्ये शोधण्यात आलेल्या फरजाद-बी वायू क्षेत्रावरील व्यवहारावर शिक्कामोर्तब न झाल्याने कंपनीने इस्रायलमध्ये तेल आणि वायू उत्खननाची प्रक्रिया सुरू केली.

इस्रायलच्या ऊर्जा मंत्र्यांनी 11 डिसेंबर रोजी एक ब्लॉक भारतीय तेल आणि वायू कंपन्यांना उपलब्ध करून दिला. ग्रीसच्या एका कंपनीला असे 5 ब्लॉक्स मिळाले आहेत.

काही प्रक्रिया पूर्ण केल्यावर ब्लॉकमध्ये तेल आणि वायूसाठी उत्खनन सुरू करू असे वक्तव्य कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एन.के. वर्मा यांनी केले. मागील 4 वर्षांमध्ये इस्रायलच्या तेल आणि वायू क्षेत्रातील हा पहिला लिलाव आहे. इस्रायलने विदेशी कंपन्यांसाठी स्वतःच्या तेल आणि वायू क्षेत्रांचा लिलाव बंद केला होता.

इस्रायलकडून मिळालेले एक वायू क्षेत्र भारताच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू 14 जानेवारी रोजी भारतात 3 दिवसांच्या दौऱयावर येणार आहेत. दोन्ही देश सुरक्षा आणि संरक्षण विषयक द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

फरजाद-बी वायू क्षेत्राच अधिकार प्राप्त करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून भारताकडून होत आहेत. भारतीय कंपन्यांची इराणसोबत फरजाद-बी वायू क्षेत्रासाठी 2008 पासून बोलणी सुरू होती. हे वायू क्षेत्र 2008 मध्येच शोधण्यात आले होते. फरजाद बी वायू क्षेत्राचा अधिकार न मिळाल्याने भारताने पर्यायी शोध सुरू केला होता.

 

Related posts: