|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » उद्योग » एअर इंडियाचे ‘किंगफिशर’ होऊ देणार नाही !

एअर इंडियाचे ‘किंगफिशर’ होऊ देणार नाही ! 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

उद्योजक विजय मल्ल्या यांच्या किंगफिशरप्रमाणे एअर इंडियाची गत सरकार होऊ देणार नाही. एअर इंडिया देशाच्या सेवेत कार्यरत राहिल असे प्रतिपादन नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति राजू यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी केले. एअर इंडियावर सध्या 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज आहे.

एअर इंडियात काम करणाऱया कोणत्याही कर्मचाऱयाने स्वतःची नोकरी गमावू नये अशी सरकारची मनीषा आहे. एअर इंडियाच्या निगुंर्तवणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एअर इंडियाची गत किंगफिशर प्रमाणे व्हावी असे आम्ही इच्छित नाही. एअर इंडियाने देशाची सेवा करावी, नागरिकांची सेवा करत भरारी घ्यावी असे सरकार इच्छित असल्याचे राजू म्हणाले.

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिस्तरीय समिती एअर इंडियाच्या निगुंर्तवणुकीवर काम करत आहे. खासदारांना सूचना करायची असल्यास त्याने ती समितीकडे करावी असे राजू यांनी सांगितले. एअर इंडियाचे पूर्णपणे खासगीकरण करण्याची शिफारस नीति आयोगाने सरकारला केली आहे. कंपनीवर अत्याधिक कर्जाचा भार असून 2012 साली मिळालेल्या बेलआउट पॅकेजच्या मदतीने ती कार्यरत आहे.

 

Related posts: