|Sunday, November 17, 2019
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स, निफ्टीमध्ये पुन्हा घसरण

सेन्सेक्स, निफ्टीमध्ये पुन्हा घसरण 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात उतार-चढावाचे चित्र दिसून आले आणि अखेरच्या तासात बाजार दिवसाच्या सर्वोच्च स्तरावरून खाली आला. गुरुवारच्या सत्रात निफ्टीने 10534.55 पर्यंत उडी घेतली होती, तर मुंबई शेअरबाजार निर्देशांकाने 34023.65 अंकांपर्यंत मजल मारली होती. परंतु दिवस अखेरीस निफ्टी 10480 अंकांच्या खाली तर सेन्सेक्स 33850 अंकांच्या खाली आला.

गुरुवारी मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांवर दडपण दिसून आले. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.1 टक्क्यांच्या तेजीसह 17692 अंकांवर बंद झाला तर निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 20991.3 अंकांवर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारून 19109 अंकांवर बंद झाला.

पीएसयू बँक, ऑटो, फार्मा आणि ऑईल अँड गॅस समभागांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. बँक निफ्टी 25490 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीच्या पीएसयू बँक निर्देशांकात जवळपास 2 टक्क्यांची घसरण नोंदली गेली. निफ्टीच्या ऑटो निर्देशांकात 0.4 टक्के आणि फार्मा निर्देशांकात 0.6 टक्क्यांची कमजोरी आली. बीएसईचा ऑईल अँड गॅस निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरला. परंतु रियल्टी आणि मेटल समभागांमध्ये चांगली खरेदी दिसून आली.

गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअरबाजार निर्देशांक 64 अंक म्हणजेच 0.2 टक्क्यांच्या घसरणीसह 33848 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांक 13 अंक म्हणजेच 0.1 टक्क्यांनी खाली येत 10478 अंकांवर बंद झाला.

गुरुवारी दिग्गज समभागांमध्ये आयओसी, एसबीआय, हीरो मोटो, ऍक्सिस बँक, सन फार्मा आणि अदानी पोर्ट्स 1.3-2.4 टक्क्यांची घसरण झाली. परंतु दिग्गज समभागांमध्ये हिंडाल्को, युपीएल, वेदांता, टाटा स्टील, डॉ रेड्डीज, एचडीएफसी बँक, विप्रो आणि आयसीआयसीआय बँक 0.5-3.6 टक्क्यांनी वधारले.

मिडकॅप समभागांमध्ये रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स कम्युनिकेशन्स, नाल्को, जीएमआर इन्फ्रा आणि जिंदा स्टील 4-9.7 टक्क्यांनी वधारले. परंतु मिडकॅप समभागांमध्ये बजाज होल्डिंग्स, कॅनरा बँक, इंडियन बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि एलअँडटी फायनान्स 1.6-2.7 टक्क्यांनी खाली आले.

स्मॉलकॅप समभागांमध्ये फ्लेक्सीटफ इंटरनॅशनल, जेपी इन्फ्रा, फिनोटेक्स केम, ड्रेजिंग कॉर्प आणि इंडो टेक 12.-20 टक्क्यांनी बळकट झाले. परंतु स्मॉलकॅप समभागांमध्ये धामपूर शुगर, द्वारिकेश शुगर, द बाइक हॉस्पिटॅलिटी, मोरपीन लॅब आणि बटरफ्लाय 3.6-6.5 टक्क्यांनी कमजोर झाले.

Related posts: