|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » देशाची घटना धोक्यात : राहुल गांधी

देशाची घटना धोक्यात : राहुल गांधी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर शाब्दिक प्रहार करत देशाची घटना धोक्यात असल्याचे वक्तव्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेवर धोका घोंगावत असल्याचे म्हणत राहुल यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाचे ‘रक्षण’ करणे ही काँग्रेसची जबाबदारी असल्याचे सांगितले. घटना देशाचा पाया असून तोच आज धोक्यात आला आहे. देशात सध्या जे घडतंय, ते योग्य नाही, परंतु आम्ही आमची एकी कायम ठेवू असे उद्गार त्यांनी काढले.

काँग्रेसच्या 133 व्या स्थापना दिनी पक्षाच्या सदस्यांना संबोधित करताना राहुल यांनी भाजप नेत्यावर देशाच्या घटनेत फेरफार करण्याचा आरोप केला. भाजप हा फेरफार गोपनीय पद्धतीने करत असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी राहुल गांधांनी पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पक्ष मुख्यालयात ध्वज फडकाविला.

भारताने मोठय़ा संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळविले होते. इतिहासात डोकावल्यास घटनानिर्मिती देशासाठी गौरवाचा क्षण होता. परंतु सध्या भाजपचे वरिष्ठ सदस्य याच्या विरोधात वक्तव्य करत आहेत असा आरोप त्यांनी केला.

आज देशात जे काही घडत आहे, ते फसवणुकीचे एक जाळं आहे. असत्याचा वापर राजकीय लाभासाठी केला जाऊ शकतो आणि हाच भाजप आणि आमच्यातील फरक आहे. आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही, आम्हाला पराभव पत्करावा लागला तरी देखील सत्याचा मार्ग सोडणार नाही असे राहुल म्हणाले.

 

 

Related posts: