|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » उद्योग » जेटलींकडून अर्थसंकल्पाची तयारी सुरू

जेटलींकडून अर्थसंकल्पाची तयारी सुरू 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. हा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2017 या दिवशी संसदेत सादर करण्यात येणार आहे. आज शुक्रवारी ते अर्थक्षेत्राच्या नियंत्रकांच्या भेटी घेणार असून त्यांच्याशी आर्थिक सुधारणा, वित्तीय तुटीची स्थिती, बँकांची थकबाकी इत्यादी विषयांवर चर्चा करणार आहेत.

वित्तीय स्थैर्य आणि विकास मंडळ (एफएसडीसी) हे एक उच्चस्तरीय मंडळ असून त्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, सेबीचे अध्यक्ष, आयआरडीएआयचे प्रमुख आणि इतर नियंत्रक संस्थांचे प्रमुख यांचा समावेश आहे.

वाढत चाललेली वित्तीय तूट हे अर्थमंत्र्यांसमोरीस सर्वात मोठे आव्हान आहे. ती नियंत्रणात ठेवण्यासंबंधी सरकारने घेतलेल्या आतापर्यंतच्या निर्णयांवर या बैठकीत विचार केला जाईल. मंडळ अर्थमंत्र्यांसमोर आपले अर्थसंकल्पीय प्रस्ताव ठेवणार आहे.

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशाचा आर्थिक विकासदर 6.3 टक्के होता. तथापि, या तिमाहीत तो प्रथमच वधारला. यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा बळ येईल अशा अशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे.

तसेच कृषी क्षेत्रावरही भर देण्याची सरकारची योजना आहे. सरकार वित्तीय तूट आणि सरकारी खर्च अशी तारेवरची कसरत अशी पार पाडते यावर बरेच काही अवलंबून आहे, अशी आर्थिक तज्ञांची धारणा आहे.

 

Related posts: