|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शांतता व एकता राखण्यासाठी चर्च संस्था सहकार्य देणार

शांतता व एकता राखण्यासाठी चर्च संस्था सहकार्य देणार 

प्रतिनिधी /पणजी :

राज्यातील शांतता आणि एकता राखण्यासाठी राज्य अधिकारिणीला चर्च मदतीचा हात देणार असल्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी ख्रिसमस निमित्त आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावेळी स्पष्ट केले.

यावेळी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मंत्री, आमदारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

गोव्यातील चर्च संस्था प्रामाणिकपणे केल्या जाणाऱया शांतता प्रस्थापित करण्याच्या कार्याला आणि एकता अबाधित राखण्याच्या प्रयत्नांना सहकार्य करणार आहे. गोव्यातील जनता सरकार, सार्वजनिक अधिकारिणी आणि चर्च यांच्याकडून चांगल्या मार्गदर्शनाची आणि चांगल्या प्रशासनाची अपेक्षा करते. महाउपनिषदातील काही श्लोकांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 मधील अमेरिकेतील संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाचाही त्यांनी उल्लेख केला. ‘वसुधैव कुटुंबकम’ याची व्याख्या करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाबाबतही ते यावेळी बोलले.

Related posts: