|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » औषधांच्या किमती घटल्याने 11,365 कोटीची बचत

औषधांच्या किमती घटल्याने 11,365 कोटीची बचत 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

औषध आणि वैद्यकीय उपकरणांच्या किमती घटल्याने डिसेंबरपर्यंत रुग्णांच्या 11,365.61 कोटी रुपयांची बचत झाली असे सरकारकडून सांगण्यात आले. वर्षात सरकारकडून 851 औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या किमती घटविण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येतात. औषध किमती नियंत्रण कायदा, 2013 नुसार महत्त्वाच्या औषधांच्या किमती कमी करण्याचा सरकारला अधिकार आहे, असे रसायने मंत्री हंसमुख मांडविय यांनी राज्यसभेत सांगितले.

औषध किमती नियंत्रण कायद्यानुसार रुग्णांच्या 11,365.61 कोटी रुपयांची बचत झाली. राष्ट्रीय औषध किमती प्राधिकरणाकडून या किमती नियंत्रणात आणल्या जातात. स्टेट्सच्या किमती घटविण्यात आल्याने 4,450 कोटी रुपयांची बचत झाली. गुडघ्यासाठी शस्त्रक्रियेच्या उपकरणांच्या किमती घटविल्याने 1,500 कोटी आणि कार्डिओ, मधुमेहविरोधी प्रकारातून 350 कोटी रुपयांची बचत झाल्याचे त्यांनी सांगितले.