|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रहिमतपूर शहरातील आयलॅण्डची जागा खाली करण्यास प्रशासनाची आठवडय़ाची मुदत

रहिमतपूर शहरातील आयलॅण्डची जागा खाली करण्यास प्रशासनाची आठवडय़ाची मुदत 

वार्ताहर/ रहिमतपूर

रहिमतपूर शहरातील गांधी चौकातील ट्राफिक आयलॅण्डची जागा खाली करण्यास व्यावसायिकांच्या विनंतीवरुन प्रशासनाने मानवतावादी दृष्टीकोनातून आठवडय़ाची मुदत दिली आहे. या मुदतीत व्यावसायिकांनी आपल्या जागा खाली न केल्यास दि. 5 जानेवारी 2018 रोजी सदर मिळकती जेसीबीच्या सहाय्याने जागा खाली करण्यात येणार असल्याचा इशारा तहसिलदार स्मिता पवार यांनी दिला.

            प्रशासनाच्यावतीने दि. 20 डिसेंबर 2017 रोजी भूसंपादना बाबतच्या नोटिसा संबंधित व्यावसायिकांना दि. 29 डिसेंबर रोजी जागा खाली करुन ताबा देण्यासाठीच्या  आल्या होत्या. त्यानुसार स्वत: तहसिलदार स्मिता पवार यांनी जागेवरु येवून संबंधित व्यावसांयिकांना 24 तासात जागा खाल्या करण्याच्या सूचना केल्या.  याच दरम्यान प्रशासकीय यंत्रनेमार्फत पोलीस बंदोबस्तात संबंधित जागांचे पंचनामे सुरु करण्यात आले. यावेळी व्यावसायिकांनी तहसिलदारांच्या समोर पर्यायी व्यवस्था करण्याची एक महिन्याची मुदत मागितली. मात्र तहसिलदारांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वाढीव मुदतीस नकार देवून जागा तात्काळ खाल्या करण्याच्या सक्त सूचना दिल्या.

            दरम्यान नगराध्यक्ष आनंदा कोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने व पालिकेच्या पदाधिकारी व व्यावसायिकांनी विनंती केली. त्यानुसार तहसिलदार स्मिता पवार यांनी व्यावसायिकांच्याकडून स्वत:हून जागा खाली करण्याबाबत लेखी हमी घेतल्यानंतरच मानवतेच्या दृष्टीकोनातून आठवडय़ाची मुदत दिली. 

            कारवाई दरम्यान सर्व मिळकत धारकांचे पंचनामे करण्यात आले. यावेळी सातारा नगररचनाकार मिलींद आवडे, सहाय्यक नगररचनाकार दिलीप कुलकर्णी, हणमंत मोरे, आंनद कांबळे, अतुल गावंडे पालिकेचे मुख्याधिकारी श्याम गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, रहिमतपूर नगरभूमापनचे भूमापक गणेश कुंभार, पोलीस पाटील दिपक नाईक, नगरसेवक, तलाठी श्री. सदावर्ते पालिका कर्मचारी, सर्व व्यावासायिक उपस्थित होते. रहिमतपूर पोलीस ठाण्याचे कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

Related posts: