|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » अमेरिकेतील कॅलिफोनिर्यात गोळीबार ;दोघांचा मृत्यू

अमेरिकेतील कॅलिफोनिर्यात गोळीबार ;दोघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या प्रचंड गोळीबाराच्या ताज्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शहरातील लोंग बीच शहरात हा प्रकार घडल्याचे माध्यमांतील बातम्यातून कळते. हा गोळीबार करणाऱया हल्लेखोराचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे हा गोळीबार झाला.

लोंग बीच पोलिसांच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियाच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2.25 वाजता ही घटना घडली आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या माहितीनुसार, हल्लेखोराने एका इमारतीतून गोळीबार केला होता. लॉ हाऊस नामक इमारतीतून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीवरुन केलेल्या गोळीबारात रस्त्यावरुन जाणाऱया दोन निष्पाप नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. लोंग बीच हे कॅलिफोर्नियातील सर्वांत सुंदर आणि महागडे शहर म्हणून ओळखले जाते.

 

 

 

 

Related posts: