|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » बार्शी – कुर्डुवाडी रस्त्यावर दरोडा ,9 प्रवासी वाहने लुटली

बार्शी – कुर्डुवाडी रस्त्यावर दरोडा ,9 प्रवासी वाहने लुटली 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

बार्शी-कुर्ड़ुवाडी रस्त्यावर मध्यरात्रीनंतर जाणाऱया वाहनांना अडवून फिल्मीस्टाईल लूट केल्याची घटना घडली आहे. 9 प्रवासी गाडय़ा लुटल्याचे समोर आले आहे.

सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने वाहने थांबवून दहशत माजवली आणि एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ प्रवासी वाहने दरोडेखोरांनी लुटली. प्रवाशांच्या अंगावरील दागिन्यांसह मोठय़ा प्रमाणात रोकड पळवली. इनोव्हा, स्कॉर्पिओ, अल्टो यासह खाजही ट्रव्हल कंपन्यांच्या दोन बसेसचा समावेश होता. दरोडेखोरांनी फक्त लूटमारच केली नाही तर लहान मुले आणि महिलांनाही मारहाण केली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी सकाळी कुर्डुवाडी पोलिस स्टेशन गाठले आणि दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला.