|Friday, February 28, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » नवीन वर्षात एअरटेलचा स्वस्त प्लॅन

नवीन वर्षात एअरटेलचा स्वस्त प्लॅन 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओने अधिकाधिक स्वस्त प्लॅन सादर केले. नवीन वर्षापूर्वीच जिओने 3300 रूपयांच्या कॅशबॅक प्लॅन सादर केला. तसेच जिओने डाऊनलोडींग स्पीडमध्ये सातत्याने 10 महिने वोडाफोन आणि एअरटेलला मागे टाकले आहे. आता पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने जबरदस्त प्लॅन सादर केला आहे.

 

जियोच्या 98 रूपयांच्या रिचार्ज पॅकला उत्तर देण्यासाठी 93 रूपयांचा प्लॅन सादर केला आहे. यात अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळेल. सोबतच रोमींगमध्ये देखील फ्री कॉलिंगच्या सुविधेच्या फायदा घेऊ शकता. इतकंच नाही तर दररोज 100 एसएमएस फ्री दिलेले आहेत. या पॅकची व्हॅलिडिटी 10 दिवसांची आहे. या दरम्यान युजर्संना 1जीबी 3जी/4 जी डेटा देखील फ्री मिळेल.

 

 

 

Related posts: