|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » अजय देवगण मराठी चित्रपटनिर्मितीत

अजय देवगण मराठी चित्रपटनिर्मितीत 

दमदार कथानक असल्याने मराठी चित्रपटसृष्टीकडे अनेक कलाकार आकर्षित होत आहे. या नवीन नावामध्ये आता अजय देवगन याचाही समावेश झाला आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘आपला माणूस’ या चित्रपटासाठी निर्मात्याचे ते काम करणार आहेत. गेल्या आठवडय़ात या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर स्वतः अजय देवगन याने प्रसिद्ध केला. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर असून एका दुचाकीवर बसलेले दिसत आहे. याव्यतिरिक्त वादळी पावसात ते दुचाकी चालवित असल्याचे दिसते. आपला माणूस या चित्रपटाची कथा एका जोडप्यावर आधारित आहे. एक तरुण विवाहित जोडपे नवऱयाच्या वडिलांबरोबर राहत असते. यावेळी नायकाला नागरी जीवन आणि नातेसंबंधातील तणावाला सामोरे जावे लागत आहे. अशाच वेळी त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडत जीवन आणि कुटुंब यांच्यावरील त्याच्या विश्वासार्हतेला प्रश्न विचारण्यास भाग पाडते. हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील लोकांनी आपल्याला साहाय्य आणि प्रेम भरभरून दिलेले आहे. आपला माणूस या चित्रपटाच्या निर्मितीच्या माध्यमातून हे प्रेम परत देण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजय याने म्हटले. अजयची पत्नी काजोल हिने चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. नाना पाटेकर यांच्याव्यतिरिक्त सुमित राघवन, इरावती हर्षे, सुधांशु वत्स यांचीही भूमिका आहे.

Related posts: