|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » आसामच्या पहिल्या सूचीत 1.9 कोटी नागरिक

आसामच्या पहिल्या सूचीत 1.9 कोटी नागरिक 

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाम सरकारने राज्यातील वैध नागरिकांची पहिली सूची प्रसिद्ध केली आहे. त्यात 1.90 कोटी नागरिकांची नावे आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ही सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आसाममध्ये बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांची समस्या मोठी आहे. या घुसखोरांना त्वरित हाकलून द्यावे आणि त्यांना नागरिकत्व देण्यात येऊ नये, अशी मागणी आसाममधील मूळच्या स्थानिक नागरिकांनी गेली चार दशके लावून धरली आहे. त्याचसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला आतापर्यंत वैध ठरलेल्या नागरिकांची सूची प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला होता. आसामची लोकसंख्या साधारणतः 3 कोटी 35 लाख असून त्यापैकी 3 कोटी 29 लाख लोकांनी वैध नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवेदने केली होती.

या सर्व आवेदनांची नियमानुसार छाननी करण्यात येत आहे. ही प्रक्रिया गेले दीड वर्ष सुरू आहे. प्रसिद्ध करण्यात येणाऱया सूचीत कोणतीही चूक राहू नये, याची दक्षता घेतली जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि त्याने सांगितलेल्या वेळेला पुढची सूची प्रसिद्ध होईल. 2018 मध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती सरकारी अधिकाऱयांनी दिली.

डिसेंबर 2013 मध्ये वैध नागरिक शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्या दीड वर्षात तिला वेग प्राप्त झाला. मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर चाळीस सुनावण्या झाल्या. सध्या आवेदनांची छाननी करण्याचे कार्य प्रतिक हजेला यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मे 2015 मध्ये राज्यातील 68.27 लाख कुटुंबांकडून 6.5 कोटी कागदपत्रे पाठविण्यात आली आहेत. काही नावे पहिल्या सूचीत न प्रसिद्ध झाल्याची शक्मयता आहे, असे स्पष्टीकरण प्रशासनाने केले आहे.

 

तथापि, कोणतेही वैध नाव वगळण्यात येणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.

सेवा केंद्रांमध्ये गर्दी

वैध नागरिकत्वाचे कागदपत्र घेऊन राज्याच्या विविध सेवा केंद्रांमध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. आपले नावे सूचित प्रसिद्ध क्हावे, यासाठी धडपड सुरू आहे. तसेच सरकारी वेबसाईटवर नागरिक आपली नावे शोधत आहेत.

Related posts: