|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बी.एम. रोटे कॉलेजचे यश

बी.एम. रोटे कॉलेजचे यश 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

दिल्ली येथे होणाऱया राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेकरीता बी. एम. रोटे ज्युनिअर कॉलेजच्या स्वप्नाली वायदंडे, करिश्मा कुडचे, वैष्णवी थोरात, ऐश्वर्या पुरी यांची महाराष्ट्र संघात निवड झाली.

नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून 19 वर्षाखालील गटात महावीर महाविद्यालयाच्या बी.एम.रोटे ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकविला. यातून त्यांची दिल्लीयेथे निवड झाली. त्यांना शारीरिक शिक्षण संचालिका अरूणा डिग्रजे, डॉ. रोहित पाटील, डॉ. बाबासाहेब उलपे, संदीप लंबे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे चेअरमन ऍड. के. ए. कापसे, महावीर देसाई, डॉ. सुषमा रोटे, प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे व पर्यवेक्षक राजेंद्र हिरकुडे यांचे प्रोत्साहन लाभले.