|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews » भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

भीमा-कोरेगाव प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असतानाच या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला. मात्र या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून, ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. हा पोलिसांचा हलगर्जीपणा असून, पोलिसांची कुमक घटनास्थळी उशिरा पोहोचली तसेच हे हिदुत्ववादी संघटनांचे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. तसेच, हिंदुत्ववादी संघटनांना कारस्थानात मदत करणाऱ्या कोरेगाव ते शिरूर आणि कोरेगाव ते चाकण या परिसरातील गावांचे  सरकारी अनुदान दोन वर्षांसाठी बंद करण्याची मागणीही डॉ. आंबेडकर यांनी केली.

 

 

 

 

Related posts: