|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पलूस नगरपरिषदेच्या स्विकृत पदी ऍड.शिवलिंग इंगळे

पलूस नगरपरिषदेच्या स्विकृत पदी ऍड.शिवलिंग इंगळे 

प्रतिनिधी/ पलूस

पलूस नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी ऍड. शिवलिंग श्रीकांत इंगळे यांची संख्याबळावर निवड झाली. काँग्रेसच्या पाठींब्यावर भाजपाच्या इनामदार गटाच्या कार्यकर्त्यास संधी देण्यात आली. निवडीनंतर काँग्रेस व भाजप समर्थकांनी पलूस नगरपरिषदेच्या आवारात गुलालाची उधळण करून फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष केला.

पलूस नगरपरिदेत काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपाकडून पाठींबा देण्यात आला होता. त्यावेळी अभिजीत गोंदील व विशाल दळवी या दोघांना काँग्रेसने स्विकृत नगरसेवकपदाची संधी दिली होती. पक्षाने ठरविल्या प्रमाणे कालावधीत संपल्यानंतर अभिजीत गोंदील यांनी राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या रिक्त पदावर निवडणूक पक्रिया होवून शिवलिंग इंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली. दरम्यान विरोधीपक्षाकडून ऍड.चंद्रकांत फाळके यांनी स्विकृत पदासाठी अर्ज दाखल केला होता. संख्याबळावर ऍड. शिवलिंग इंगळे हे विजयी ठरले. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवलिंग यांच्या निवडीची घोषणा होताच नगरपरिषदेच्या आवारात इनामदार गटातील कार्यकर्त्यानी मोठया जल्लोष केला.

 पहिल्याच नगरपरिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसच्या बाल्लेकिल्यात भाजपाने एक जागा मिळवून कमळ फुलवले होते. त्यानंतर मिळालेल्या संधीचा उपयोग विकास कामांसाठी व्हावा यासाठी सदसद विवेक विचाराने इनामदार गटाने काँग्रेस पक्षास पाठींबा दिला. दिल्या घेतल्या वचना प्रमाणे आज स्विकृत नगरसेवक पदाची संधी त्यांच्या गटास मिळाली. त्यामुळे सभागृसात इनामदार गटाची ताकद आणखी वाढली आहे. शिवलिंग इंगळे हे नेहमी सामाजिक कार्यात असतात, त्यांना जेवढे कायदेशीर अभ्यास आहे. तेवढाच त्यांचा राजकारणात देखील आहे. हे या निवडणूकीतून पलूस शहरातील नागरीकांना समजून आले. शिवलिंग इंगळे यांनी अनेक गोरगरीब जनतेची कामे करीत आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. स्विकृत नगरसेवक पद मिळाल्यामुळे आणखी सामाजिक कार्याच्या कक्षा रूंदावल्या जाणार आहेत.

निवडीवेळी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष राजाराम सदामते यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी पल्लवी पाटील, उपनगराध्यक्ष विक्रम पाटील, गटनेते सुहास पुदाले, भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष अमरसिंह फडनाईक-इनामदार, भरतसिंह इनामदार, सोमनाथ पाटील, ऋषीकेश देवळे, भरत सुतार, प्रशांत पवार,  मानसिंग इनामदार, महिला व बालकल्याण सभापती रेखा भोरे, नगरसेवविका सुरेखा फडनाईक, नगरसेवक मिलिंद डाके, अमोल भोरे, नितीन जाधव, अधिक मोरे संदीप सिसाळ, के.डी.कांबळे, प्रतापतात्या गोंदील, पाणीपुरवठा सभापती परशुराम शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर स्विकृत नगरसेवक ऍड. शिवलिंग इंगळे यांनी कार्यकर्त्यासोबत काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंतराव पुदाले व खाशाबा दळवी यांची भेट घेतली. इनामदार यांच्या निवासस्थानी इनामदार पुटुंबियांच्या वतीने शिवलिंग इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

              भाजप-काँग्रेस एकाच गुलालात

 महाराष्ट्र असो वा गुजरात  देशात सर्वच ठिकाणी भाजपा विरोधात काँग्रेस असे चित्र पहावयास मिळते मात्र पलूस नगरपरिषदेत भाजप व काँग्रेस एकत्र गुलालात नव्हालेली दिसून आली. गुलालाची उधळण करीत एकमेकांना अलिंगन देताना पाहणाऱया लोकांच्यामध्ये भाजपा-काँग्रेस एकीची चर्चा रंगली होती.

Related posts: