|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » दिवसातील तेजी बाजाराने गमावली

दिवसातील तेजी बाजाराने गमावली 

बीएसईचा सेन्सेक्स 19 अंशाने घसरला, एनएसईचा निफ्टी वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

वर्षातील सलग तिसऱया दिवशी बाजारात चांगलाच चढउतार दिसून आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत संकेत मिळाल्याने बाजाराने चांगली सुरुवात केली होती. निफ्टी 10,503 आणि सेन्सेक्स 33,998 पर्यंत वधारला होता. मात्र शेवटच्या तासात बाजारातील दबाव वाढला आणि निफ्टी मंगळवारच्या पातळीवर बंद झाला, तर सेन्सेक्सही कोसळला. निफ्टीने 60, तर सेन्सेक्सने 200 अंशाची तेजी गमावली.

बीएसईचा सेन्सेक्स 19 अंशाने घसरत 33,793 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी केवळ 1 अंशाने वधारत 10,443 वर स्थिरावला. बँक निफ्टी 0.1 टक्क्यांच्या घसरणीने 25,319 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.7 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

वाहन, औषध, तेल आणि वायू समभागात सर्वाधिक विक्री झाली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.5 टक्के आणि औषध निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरला. बीएसईचा तेल आणि वायू निर्देशांक 0.25 टक्क्यांनी घसरला. एफएमसीजी, धातू, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू समभागात खरेदी झाली.

दिग्गज समभागांची कामगिरी

अदानी पोर्ट्स, एल ऍण्ड टी, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्को, अंबुजा सिमेंट, येस बँक, टाटा मोटर्स 2.8-1 टक्क्यांनी वधारले. डॉ. रेड्डीज लॅब, विप्रो, ओएनजीसी, बजाज ऑटो, मारुती सुझुकी 3-1.4 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात जिंदाल स्टील, अदानी एन्टरप्रायजेस, युनायटेड बुअरीज, ओरॅकल फायनान्शियल, टाटा केमिकल्स 8.1-3.6 टक्क्यांनी मजबूत झाले. रिलायन्स कम्युनिकेशन्स, एम्फेसिस, ग्लॅक्सो कंझ्युमर, अपोलो हॉस्पिटल, क्रिसिल 5.6-1.4 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात अंबिका कॉटन, पॅनासोनिक कार्बन, विकास इकोटेक, फिलिप्स कार्बन 20-15.6 टक्क्यांनी वधारले. थीमस मेडिकेयर, डीबी रियल्टी, आर्कोटेक, बीईएमएल 5.7-3.4 टक्क्यांनी घसरले.